उद्याच्या पायाभरणीचे निर्माण
सर्व अभियांत्रिकी शाखांची आई... स्थापत्याशिवाय काहीच नाही... सगळ्या जगाचा पाया रचणार एकच सत्य... भक्कम केलयं सगळ्या जगाचं अस्तित्व... सगळी सुरुवात इथुनच आणि शेवट पण इथच... स्थापत्य...
फक्त आणि फक्त अभियांत्रिकी स्थापत्य.. स्थापत्य अभियांत्रिकी ही सामान्य मनुष्यावर अत्यंत प्रभावी असणारी अभियांत्रिकी मधील पायाभूत शाखा आहे. सामान्य जनतेचा शास्त्रोक्त उद्धार आणि शास्त्रीय ज्ञान यांचे उपाययोजन करून समाजाचे कल्याण यावर जास्त भर देते.
कोणत्याही शास्त्रोक्त कार्यावर अभियांत्रिकीचा असलेला प्रभाव विसरणे अशक्य आहे. स्थापत्य अभियंत्यांना सरकारी, व्यक्तीगत, सार्वजनिक, औद्योगिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात व्यवसायाची संधी उपलब्ध आहेत.
पदवी किंवा पदविका संपादन केलेले स्थापत्य अभियंते व्यक्तिगत सल्लागार म्हणून कार्य करु शकतात. बांधकाम क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स मध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
सिव्हिल विभागात प्रवेश घ्या आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ञ बना!
आताच अर्ज करा