भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी
सध्याच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ही शाखा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मुख्यतः संचार तंत्रज्ञानासोबत मूलभूत इलेक्ट्रॉनिक घटक, सर्किट्स आणि सिस्टीम डिझाइनचा वापर केला जातो.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन यांसारख्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची मागणी प्रचंड वाढली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही शाखा संशोधन, मोबाईल कम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन, रोबोटिक्स, डिफेन्स, रेडिओ कम्युनिकेशन, टीव्ही प्रसारण, टेलिग्राफी, टेलिफोन, VLSI डिझाईन, DSP, परमाणु विज्ञान, वायरलेस कम्युनिकेशन आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रांत भरपूर संधी उपलब्ध करून देते.
आपल्या खिशातील एफएम रेडिओ, टेलिव्हिजन, संगणक, मोबाईल फोन, तसेच अंतराळातील उपग्रहांपासून प्रत्येक तंत्रज्ञान या शाखेच्या प्रगतीचे प्रतीक आहे. 5G तंत्रज्ञान, स्मार्ट सिटीज, ऑटोनॉमस व्हेईकल्स यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अत्यंत महत्त्वाचे आहे.
इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रवेश घ्या आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा भाग बना!
आताच अर्ज करा