उत्कृष्ट तांत्रिक शिक्षण

इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग

भविष्यातील ऊर्जेची पायाभरणी

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे महत्त्व

विद्युत अभियांत्रिकी ही अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात मोठी व विविध क्षेत्रात प्रभाव असणारी एक शाखा आहे. विद्युत शक्ती व संदेशाचा वापर केल्या जाणाऱ्या प्रणालींची व उपकरणांची रचना, उत्पादन, उपयोजन व विकास करणारी ही शाखा आहे.

ही शाखा विद्युत व विद्युत चुंबकत्वाचा अभ्यास व त्यांचे उपयोग यांच्याशी निगडीत आहे. तसेच इलेक्ट्रिक मोटर्स, नेव्हीगेशन सिस्टम्स, मेडिकल उपकरण, ब्रॉडकास्ट आणि कम्युनिकेशन सिस्टम, वीज निर्मिती प्रणाली, इलेक्ट्रिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम्स, इलेक्ट्रिक ग्रिड इत्यार्दीसारख्या उपकरणांच्या विकासाठी आणि देखभाल करण्याकरिता वीजेचा अभ्यास महत्वाचा आहे.

नोकरी आणि व्यवसायाच्या संधी

उत्पादन उद्योग, सर्व प्रकारचे वीज प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात वीज कंपन्या, वीज निर्मिती आणि वितरण संबंधीत प्रकल्पांना कायम ठेवण्यासाठी विद्युत अभियंत्यांच्या शोधात असतात. सार्वजनिक, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील उत्पादन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.

नवीन तंत्रज्ञान जसे की स्मार्ट ग्रिड, रिन्यूएबल एनर्जी, इलेक्ट्रिक व्हेईकल्स, ऑटोमेशन आणि IoT यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची मागणी प्रचंड वाढली आहे.

६०+
विद्यार्थी क्षमता
६+
प्रयोगशाळा
१००%
नोकरी हमी
२८+
वर्षे अनुभव

डिप्लोमानंतरच्या भविष्यातील संधी

सरकारी क्षेत्र
  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पेरेशन (NTPC)
  • पॉवर ग्रीड कॉपोरशन ऑफ इंडिया (Power Grid)
  • भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (BHEL)
  • तेल व नैसर्गिक गॅस निगम (ONGC)
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL)
  • कोल इंडिया लिमिटेड (CIL)
  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (SAIL)
  • अणुऊर्जा संयंत्र, औद्योगिक बीज प्रकल्प
  • महाराष्ट्र राज्य विद्युत नियमन महामंडळ
  • सार्वजनिक बांधकाम विभाग
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन
  • भारतीय रेल्वे
  • भारतीय नौदलात विविध संधी
  • इंडियन एअर फोर्स
खाजगी क्षेत्र
  • एबीबी (ABB)
  • बजाज इंटरनेशनल प्रायव्हेट लि.
  • क्रॉम्प्टन ग्रीव्हज लि.
  • सीमेन्स लि. (Siemens)
  • रिलायन्स पॉवर लि
  • लार्सन अण्ड टुर्बो लि. (L & T)
  • विप्रो लाईटींग
  • टाटा पॉवर
  • अदानी पॉवर
जॉब प्रोफाईल
  • अधिक सक्षम इलेक्ट्रिकल यंत्रे डिझाईन आणि विकसीत करणे
  • डिझाईन इंजिनिअर
  • कॉलिटी कंट्रोल इंजिनिअर
  • टेक्ट इंजिनिअर
  • रिलायबिलीटी इंजिनिअर
  • प्रोसेस अॅन्ड मॅन्युफॅक्चरींग इंजिनिअर
  • पॉवर सिस्टम इंजिनिअर
  • मेंटेनन्स इंजिनिअर
व्यवसाय
  • इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर
  • इलेक्ट्रिकल व्हेंडिंग
  • सोलर पॅनल इन्स्टॉलेशन
  • इलेक्ट्रिकल कन्सल्टन्सी
  • मोटर रिवाइंडिंग व्यवसाय
  • इलेक्ट्रिकल मेंटेनन्स सर्व्हिस

आमचे तज्ञ फॅकल्टी

Principal
प्रा. डॉ. नितीन सावगावे
प्राचार्य
HOD
प्रा. राजेंद्र पाटील
विभाग प्रमुख
Faculty 1
प्रा. संजय जाधव
वरिष्ठ प्राध्यापक
Faculty 2
प्रा. अशोक शिंदे
प्राध्यापक

प्रयोगशाळा

Lab 1
इलेक्ट्रिकल मशीन्स लॅब
Lab 2
पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लॅब
Lab 3
इलेक्ट्रिकल मेजरमेंट लॅब
Lab 4
कंट्रोल सिस्टम लॅब

तुमचे करिअर सुरू करण्यासाठी तयार आहात?

इलेक्ट्रिकल विभागात प्रवेश घ्या आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ बना!

आताच अर्ज करा