डिजिटल भविष्याची निर्मिती
संगणक अभियांत्रिकी नविन तंत्रज्ञानाचा शोध व नविन कल्पना तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवितो. आज उत्पादन आणि त्याला निगडीत असणाऱ्या अनेक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा, संगणकाचा उपयोग वेगवेगळ्या पध्दतीने होत आहे.
संगणकामुळे आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे आणि जलदगतीने करणे सोपे झाले आहे, त्यासाठी सायबर सिक्युरिटी, क्रिप्टोग्राफी या सारखे तंत्रज्ञान मदत करते. संगणक अभियांत्रिकीचे दोन प्रकारात वर्गीकरण होते - १) सॉफ्टवेअर अभियंते २) हार्डवेअर अभियंते.
कॉम्प्युटर इंजिनिअरमुळे इंटरनेट सेवांचा व डिजिटल इंडिया या सारख्या कल्पनांचा विकास होत आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
IT कंपन्या, स्टार्टअप्स, बँकिंग क्षेत्र, ई-कॉमर्स, आणि अनेक उद्योगांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअर्सची प्रचंड मागणी आहे.
कॉम्प्युटर विभागात प्रवेश घ्या आणि IT क्षेत्रातील तज्ञ बना!
आताच अर्ज करा